EducationalReal Estateरिडेव्हलपमेंटसाठी विकसक निवडताना…

March 25, 2022by Ojas Vyas0

 

आपली इमारत 30-40 वर्षे जुनी झाली की साहजिकच अनेक सभासदांना वेध लागतात ते रिडेव्हलपमेंटचे. वरवर अगदी सोप्पी वाटणारी ही प्रक्रिया तशी वरीच किचकट आहे. सभासदांचे एकमेंकांशी असलेले मतभेद, प्रत्येकाच्या वैयक्तिक मागण्या आणि मतं ही काही सोप्पी उदाहरणे आहेत जे प्रश्न सुरुवातीपासूनच समोर यायला सुरुवात होते. ही झाली सभासदांच्या किंवा सोसायटीकडील प्रश्नांची छोटी झलक.

जेव्हा विकसक निवडण्याची प्रक्रिया सुरु होते त्यावेळेस ही गुंतागुंत आणखीनच वाढते. विकसक चांगला आहे ना, आपल्याला फसवणार तर नाही ना, त्यांचे आधीचे प्रॉजेक्ट कसे आहेत. या आणि अशा प्रश्नांचा मारा सुरु झाल्यावर अजून गोंधळ उडतो आणि अनेक इमारतींची रिडेव्हलपमेंट खोळंबून राहते. अशावेळेस विश्वासू आणि भरवश्याचा विकसक कसा निवडायचा हा मोठा प्रश्न समोर उभा राहतो. यासाठी पुढील दिलेल्या काही टिप्स आपल्याला उपयोगी ठरु शकतील.

Sudhendu,2 & 3 BHK Homes With Maximum Livable Area At Rambaug Colony Kothrud

फक्त पैसे नाही तर दर्जा महत्वाचा.

Best redeveloper in pune

रिडेव्हलपेंटसाठी विकसक ठरवताना आपण आर्थिक बाजू अगदी चोख बघून घेतो. यासाठी अगदी वैयक्तिक वकिलही नेमला जातो. मात्र या सगळ्यात कामाच्या क्वालिटीकडे आणि प्रत्यक्ष बांधणीच्या आधी होणा-या प्रक्रियेकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.

विकसकाची माहिती पुढील मुद्यांवर चोख ठरते का ते तपासा.

  • विकसकाचे नाव एक चांगला ब्रँड म्हणून प्रस्थापित आहे का?
  • ज्या भागात रिडेव्हलपेंट होणार आहे त्याभागात याआधी विकसकाने कोणते काम केले आहे का? असल्यास त्या बांधकांमांना प्रत्यक्ष भेट द्यायचा प्रयत्न करा.
  • काम वेळेत पुर्ण करण्यासाठी विकसकाकडे काही आकडेवारी किंवा रिपोर्ट आहे का.
  • विकसकासाठी काम करणारा आर्किटेक्ट आणि वकिल कोण आहे. या क्षेत्रात त्यांचा अनुभव कसा आहे.
  • याआधी पुर्ण केलेल्या बांधकामांमध्ये सर्व कायदेशीरबाबी विकसकाने पुर्ण केल्या आहेत का
  • कोणत्याही आणिबाणीच्या किंवा गरजेच्या वेळी विकसक स्वत: तुम्हाला भेटण्यासाठी वेळ देऊ शकतो का.

याशिवाय त्या बिल्डरच्या वेबसाईटला भेट द्या , ती वेबसाईट अपडेटेड आहे का ते तपासा.

एक चांगला बिल्डर अनेक कामांमध्ये व्यस्त असतो , अशावेळेस प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार आहे हे विकसकाला नक्की विचार. “लगेच सुरु करु काम” असं म्हणणारा विकसक बहुतेक तुमच्याकरता योग्य नसू शकतो.

©️ Rajesh Vyas Group

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT BLOG
FOR ORGAN DONATION CONTACT:
https://www.vyasbuildcon.com/wp-content/uploads/2024/12/mohan-foundation-icon-ver2-1.png
Copyright © 2020 Vyas Buildcon . All Rights Reserved. Developed By A K Media